‘द पीपल्स पोस्ट’ विषयी

‘द पीपल्स पोस्ट’ विषयी

फुले-शाहू-आंबेडकर (पुरोगामी) चळवळीला वाहिलेलं, महाराष्ट्रातील ‘द पीपल्स पोस्ट’ हे एकमेव ‘ना नफा-ना तोटा’ तत्वावर चालणारं पाक्षिक आहे . सुरवातीपासून द पीपल्स पोस्टने जी चळवळीची भूमिका घेतलेली आहे, ती निर्भीड आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रिसूत्रीवर ‘द पीपल्स पोस्ट’चा मनोरा उभा आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील सर्व मान्यवर ‘द पीपल्स पोस्ट’साठी आवर्जून लिहितात. ‘द पीपल्स पोस्ट’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील लेखकांना, विचारवंतांना अभिव्यक्तीचं व्यासपीठ मिळालेलं आहे. ‘पीपल्स पोस्ट’च्या पहिल्या अंकापासून आजतागायत कधीही पीपल्स पोस्टने तत्वाशी तडजोड केलेली नाही. प्रस्थापित, मनुवादी व्यवस्थेचा उंट पाडण्याचं कामं सुरवातीपासून ‘द पीपल्स पोस्ट’ करीत आहे. थोडक्यात, ‘उंटाला नडायचं’ काम पीपल्स पोस्ट करीत आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ‘द पीपल्स पोस्ट’ पाक्षिकाचे प्रकाशन करण्यात आले होते, तो क्षण.

‘द पीपल्स पोस्ट’ चा प्रकाशन सोहळा २९ ऑगस्ट २०१८ रोजी मुंबई येथील (रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी ) येथे अत्यंत थाटात झाला होता. लोकसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि सध्याचे अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष श्री.मल्लिकार्जुन खरगे, माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्रोफेसर सुखदेव थोरात, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, दिग्दर्शक श्री नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाला होता. सुरवातीपासूनच ‘द पीपल्स पोस्ट’ला लोकांचा गराडा लाभलेला आहे. या भयभीत काळात ‘द पीपल्स पोस्ट’सारखे पाक्षिक नेटाने काम करीत आहे.

‘द पीपल्स पोस्ट’चे संपादक मा.चेतन शिंदे यांच्या कल्पनेतून जन्माला आलेलं हे ‘द पीपल्स पोस्ट’चं रोपटं, वटवृक्षाकडे वाटचाल करीत आहे.

‘द पीपल्स पोस्ट’च्या वार्षिक वर्गणीच मूल्य केवळ ८००/- रु असून या चळवळीच्या कामात वर्गणी भरून सहकार्य करावे, ही मनोकामना !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *