बेटा….- बुध्दभुषण साळवे

बेटा….- बुध्दभुषण साळवे

बेटा…
उद्याचा सूर्य तुला बघता यावा
म्हणून मी पेटवतोय आज
माझ्यातला सूर्य नित्यनियमानं
तू बंडाची भाषा विसरू नकोस हं
उद्या तुलाच सांभाळायचीय ही धुरा
हा क्रांतीचा सूर्य पाठीवर घेऊन
तुलाच चालायचंय
या मळकटलेल्या व्यवस्थेवरून
अहिंसेचं बोट धरून…


तेव्हा,
तू करून घे इंस्टॉल
करप्ट न होणारं
समतेचं सॉफ्टवेअर
तुझ्या हार्डडिस्कमध्ये
या कीबोर्डवरची बटनं
हाताळायचीत पुढं तुलाच…


बेटा…
माझ्यावर फारसा
राहू नको तू अवलंबून
मी उद्या असेन नसेन
पण
बुद्ध दाखवीत राहील
तुला कायमच मार्ग
अजरामर आहे
बाबासाहेबांचं दिशादर्शक बोट
अत्त दीप भवचा मंत्र मात्र
आयुष्यभर जपून ठेव.

– बुध्दभूषण साळवे, नाशिक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.