या जिभेवरच्या बेड्या अन् ही कवितेची नसबंदी

या जिभेवरच्या बेड्या अन् ही कवितेची नसबंदी

इथे डीजेच्या गोंगाटात ऐकू येत नाही आईची शपथ
हा जिओ मोडीत काढतो नेटपॅकपुरतीच उरलेली बापाची गरज
ही सेल्फिश पिढी एकांताला करते सोशल
प्रत्येकाला मिळत नाही भूतकाळ पुसण्याचा साबण सनीसारखा
हे ट्रोलभैरव वायफाय उद्धरतात आयमाय
हे सायबर व्हॅलीतले दरोडेखोर करतात तुम्हाला कॅशलेस

हे कधीच लाईन न मिळालेले भूकाळ
यांना लाभलीय लव जिहाद ओळखण्याची दिव्यदृष्टी
हा संन्याशांचा करिअर ग्राफ टोचतो शल्य लग्न केल्याचं

उगवत्या सूर्याला सलाम केला तरी
मिळत नाही जिवंत राहण्याची हमी
ही पसरलीय साथ कणा गायब होण्याची
ही संपत नाही देशद्रोहाच्या आरोपांची यादी
हा सुपारीबाज चौथा खांब घेतो टीआरपीची काळजी
या जिभेवरच्या बेड्या अन् ही कवितेची नसबंदी
ओएलएक्सवर स्वतःला विकण्याच्या स्पर्धेत
लोकहो, आता लेकरू सांभाळणं सोपं,
तत्त्व सांभाळणं अवघड आहे.

– अमोल बागूल, नाशिक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.