नमस्कार, मैं रविश कुमार…- प्रा. अर्जुन अ. पगारे

नमस्कार, मैं रविश कुमार…- प्रा. अर्जुन अ. पगारे

 माझ्या या प्रवासात मी खुर्चीवर बसलेल्या अनेकांना स्वतःच अस्तित्व गमावताना पाहिलं, तुम्हीदेखील पाहिलं असेल. अनेक संस्थांना उद्ध्वस्त होताना पाहिलं. द्वेषाच्या वातावरणात अनेक लोकांना दिशाभूल होताना पाहिलं; मात्र याच प्रवासात मी एक नवीन संस्था तयार होतानादेखील पाहतो आहे. ती म्हणजे प्रेक्षकांची संस्था. तुम्हा लोकांची संस्था. ही संस्था छोटी असेलही; मात्र आपल्या लोकशाहीत ‘लोक’ नावाचं झाड तुम्ही सुकू दिलेलं नाही.

(NDTV चे संपादक रविश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर केलेल्या निवेदनाचा अनुवाद)

तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे, की मी काय सांगणार आहे; परंतु माझी तुम्हाला विनंती आहे, की मी जे पण सांगणार आहे, ते थोडं धाडस करून ऐका. भारतात पत्रकारितेचा सुवर्णकाळ कधीच नव्हता, तसं पत्रकारितेचं भस्मयुगदेखील नव्हत. भस्मयुग याचा अर्थ मी असा घेतो, की जेव्हा या पेशातील सगळ्या चांगल्या बाजू अतिशय वेगाने भस्म केल्या जात आहेत. हा दिवस भारतीय पत्रकारितेत येणारच होता. इथे वेगवेगळ्या नावाने अनेक टीव्ही चॅनल सुरू झालेत; परंतु आहेत ते सर्व ‘गोदी मिडिया’. या नव्याने आलेल्या पत्रकारितेने पत्रकारितेची व्यवस्था आणि पत्रकारितेसाठीचं आवश्यक वातावरण संपुष्टात आणलं. असं असलं तरी, खरी पत्रकारिता करण्याचा दावादेखील सगळेच करतात. महत्त्वाचं तेदेखील असा दावा करतात, ज्यांच्या ताकदीने या देशात दररोज पत्रकारिता पायदळी तुडवली जाते. हेच पत्रकारिता करणारे जेव्हा उच्च दर्जाची पत्रकारिता करण्याची भाषा करतात, तेव्हा त्यांच्याकडे संशयाने पाहणे आवश्यक आहे. गोदी पत्रकारिता आणि सत्ताधारी दोन्ही, पत्रकारितेचा नवा अर्थ तुमच्यावरती लादण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, त्यांना जे सांगायचे आहे तेच दाखवणार. तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा या जाळ्यात अडकण्याची शक्यता निर्माण होते.
या वेळी मला माझ्या संस्थेविषयी काहीच बोलायचं नाही. कारण भावनिक स्थितीत तुम्ही स्वतःला तटस्थ ठेऊ शकत नाही. NDTV मध्ये मी 27 वर्षे काम केलं. एवढ्या मोठ्या प्रवासात मी अनेक चढ-उतार पाहिले. अनेक सहकारी, त्यात वरिष्ठ, कनिष्ठ सर्वांची साथ मला मिळाली. ती माझ्यासाठी मोलाची होती. त्या सर्वांविषयी आज जास्त बोलता येणार नाही. मात्र माझ्यासाठी जे आदरणीय आहेत, त्यांची आठवण या क्षणी येत आहे. खूपच चांगल्या आठवणी माझ्या छऊढत सोबत राहिल्या आहेत.
आज या क्षणी कोणा एका व्यक्तीचं नाव घेणं माझ्यासाठी फारच अवघड आहे. कारण माझ्या व्यावसायिक जीवनात अनेक लोकांचा हात आहे. माझे जुने सहकारी आणि सध्याचे सहकारी सर्वांकडूनच मला काही ना काही मिळाले आहे. त्यामुळे मी सर्वांचाच ऋणी आहे. अशा भावनिक वेळी एकाच व्यक्तीचं नाव घेणं न्याय्य होणार नाही. या वेळी मला प्रत्येक चेहरा चांगला वाटतो आहे. कारण या सर्वांनी मला अनेक अनुभव देऊन माझं आयुष्य समृद्ध केलं आहे. ज्यावेळी लग्न झालेली मुलगी सासरी निघते, तेव्हा ती वेळोवेळी मागे वळून आपल्या माहेराला बघत असते. सध्या माझीही अशीच अवस्था झाली आहे. तेव्हा मलासुद्धा मागे वळून पाहू द्या. पुढे कधीतरी विस्ताराने छऊढत विषयी बोलेन. खास करून छऊढत विषयी, डॉ. प्रणव रॉय, राधिका रॉय यांच्यासंदर्भात. माझा छऊढत सोबत 27 वर्षांचा प्रवास आहे, त्यामुळे खूप गोष्टी आहेत. त्यादेखील जरूर सांगेल, जेव्हा मी भावनिक नसेल आणि तुम्हीदेखील.
ऑगस्ट 1996 मध्ये माझा NDTV सोबतचा प्रवास सुरू झाला, तो अनुवादकाच्या रूपाने. त्या अगोदर मी प्रेक्षकांकडून आलेले पत्र निवडण्याचं काम करत होतो. तेव्हा प्रेक्षक पोस्टाने पत्र पाठवत असत. माझं काम होतं, त्यातून योग्य पत्रांची निवड करून त्यावर रिपोर्ट तयार करणे आणि निवेदक, प्रोड्युसर यांना सादर करणे. मजुरीचं काम होतं त्याच हिशेबाने पैसेदेखील मिळत होते. आजही अनेकांची पत्रे, मेसेज मला येतात. मी अनेकांचे पत्र, मेसेज वाचतो. शक्य तेवढ्या प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतो. अनेकांकडे मी पाठवलेली उत्तरे असतीलही. प्रेक्षकांच्या पत्रांसोबत सुरू झालेला प्रवास आजही सुरू आहे. त्या पत्रांमधून अनेक त्यांच्या अपेक्षा, काहींनी मार्गदर्शन, काहींनी तक्रारी, तर काहींनी रागावलेदेखील आहे. यामध्येच माझं झोपणं, जागणं, जगणं सुरू होतं. यातून आपल्याशी माझं नातं कसं जुळत गेलं, मी स्वतःला तुमच्यात इतका गुंतवत गेलो, ते आजपर्यंत घरी पुन्हा परतलोच नाही. मात्र आता स्वतःला वेळ देऊ शकेल. आजची सायंकाळ अशी आली आहे, की आज चिमणीला स्वतःचं घरटं डोळ्यांना दिसेनासं झालंय. तिला कोण सांगणार, तिचं घरट कोणीतरी पळवून नेलंय. आता मात्र त्याच्यासमोर उरलंय ते फक्त मोकळं आभाळ.
असो, त्यानंतर अनुवादक झालो. पुढे रिपोर्टर झालो. त्यातून मला खूप काही शिकायला मिळत गेलं. त्या शिक्षणातूनच छऊढत मध्ये समूह संपादक झालो आणि आज या पदाचा राजीनामा देत आहे. यामागे खूप मोठ्या शक्ती आहेत. त्यामुळे ही वेळ येणार याचा अंदाज मला अगोदरच आला होता, मात्र तो दिवस आज उजाडला. आज चांगलं तर निश्‍चितच वाटत नाहीये, मात्र जेव्हा केव्हा माझं मूल्यमापन कराल, तेव्हा मात्र माझ्या बाबतीत ही सहानुभूती ठेऊ नका, की पत्र निवडण्याचं काम करणारा पुढे मोठा समूह संपादक झाला. कारण मी त्यांच्यासारखा नाही, की उतरतात विमानातून आणि चहा विकण्याच्या गोष्टी करतात. मी माझा संघर्ष मोठा कठीण होता, हे सांगण्याचा माझा उद्देश नक्कीच नाही. मला वाटतं, या देशात अनेकांचा संघर्ष हा डोंगर चढण्यासारखा आहे. माझ्या या प्रवासात मी खुर्चीवर बसलेल्या अनेकांना स्वतःचं अस्तित्व गमावताना पाहिलं, तुम्हीदेखील पाहिलं असेल. अनेक संस्थांना उद्ध्वस्त होताना पाहिलं. द्वेषाच्या वातावरणात अनेक लोकांना दिशाभूल होताना पाहिलं, मात्र याच प्रवासात मी एक नवीन संस्था तयार होतानादेखील पाहतो आहे. ती म्हणजे प्रेक्षकांची संस्था. तुम्हा लोकांची संस्था. ही संस्था छोटी असेलही, मात्र आपल्या लोकशाहीत ‘लोक’ नावाचं झाड तुम्ही सुकू दिलेलं नाही.
मला जेव्हा संधी मिळाली, तेव्हा मी पूर्ण स्वतःला झोकून काम केलं. कारण मला ही संधी मला तुमच्यासाठीच मिळाली आहे. तुम्हा सर्व प्रेक्षकांचा माझ्यावर खूप अधिकार राहिला आहे. तुम्हांमुळे माझ्या अवतीभोवती न्यूज रूम तयार झाली. जनतेची न्यूज रूम जी ऑफिसमध्ये नाही तर तुमच्या घरात, तुमच्या डोक्यात तयार झाली.
भारतातीलच नाही तर जगातील किती तरी प्रेक्षकांनी मला मदत केली. शिवाय या मोबदल्यात त्यांनी माझ्याकडे कधीही पैशाची मागणी केलेली नाही. विदेशातील अनेकांनी माझ्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड केले, संशोधन करून मला पाठवलं. मी केलेल्या सर्वच कार्यक्रमांत प्रेक्षकांचं मोठं सहकार्य मला मिळालं आहे. तुम्ही प्रेक्षकांनी माझ्या माहितीत अनेक सुधारणा सुचवलेल्या आहेत. अनेक तज्ज्ञ, भारतीय प्रवासी, स्थानिक भारतीय विद्यार्थी, प्रेक्षक होण्यासोबतच माझ्यासोबत राहिले. स्वतः पत्रकार बनून पत्रकारिता व्यवसायातील या छोट्याशा बेटाला वाचवण्यात योगदान देत राहिले. या सर्व प्रक्रियेला उद्ध्वस्त होताना पाहणे, प्रेक्षक होण्याच्या प्रक्रियेला उद्ध्वस्त होताना पाहणे आणि पुन्हा त्यांना प्रेक्षक होताना पाहणे, हा सुखद अनुभव राहिला. तुम्हा प्रेक्षकांमधील अनेकांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद करून मला सहकार्य केले. संदर्भांची कमतरता तुम्ही कधी पडू दिली नाही. ती फक्त याकरिता, की ‘प्राइम टाईम’मध्ये सर्वोत्तम दाखवलं जावं. कारण प्राइम टाईम माझा नाही तर तुमचा होता.
कधी शो खराब झाला, तर तुम्ही सांगायला संकोच केला नाही. तुम्ही प्रेक्षकच माझे निरंतर संपादक म्हणून माझ्यासोबत राहिलात. एखादं झाड मोठं होतं, त्याकरिता त्याला अनेक पावसाळ्यांचं पाणी लागतं. त्याचप्रमाणे तुमच्यासारख्या प्रेक्षकांत एखाद्या रविश कुमारच असणं आहे. तुम्ही प्रेक्षकच प्रत्येक हंगामात पाऊस बनून पडता आणि इथे सुकणार्‍या झाडांना हिरवं करत जातात. तुमच्यामुळेच YOUTUBE, TWITTER वर अनेक पत्रकार उभे राहू शकले. त्या सर्वांच्या मागे तुम्हीच खंबीरपणे उभे आहात. अनेकांना तुम्ही subscriptions करून आर्थिक मदत मिळवून देण्यात पुढाकार घेता.
या लोकशाहीत एकही संस्था, जी मजबूतपणे उभी राहिलेली दिसत नाही. इथे न्यायव्यवस्था कमजोर होत जाते, तेव्हा तुम्ही प्रेक्षक आश्‍वासक म्हणून पुढे सरसावता. मला वाटतं, तुम्हीच पत्रकारितेचा स्तंभ आहात. पत्रकारिता आता कुठल्याही संस्थेत दिसत नाही. ती पत्रकारिता तुमच्यासारख्या प्रेक्षकांत जिवंत असल्याचे जाणवते. तुमच्यामुळे काही नि:पक्ष पत्रकार प्रश्‍न विचारताना हिंमत करतात. हेच तुमचे फार मोठे योगदान आहे.
लोकांचा आवाज कोणीतरी दाबून टाकेल. त्या आवाजात धार्मिक व्देष भरून लोकशाहीला संपविण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र तुमच्यासारख्या प्रेक्षकांचं असणं लढणार्‍यांना ताकद देत राहिलं. इथे लोकशाही संपेल; परंतु सुंदर लोकशाहीचं स्वप्न कधीही भंगणार नाही. कारण तुम्ही प्रेक्षक तुमच्या जबाबदारीला चांगले ओळखून आहात. या संकटाच्या काळात तुम्ही एका पत्रकारावर विश्‍वास ठेवता, त्याच्यावर प्रेम करता. अनेक मोठ्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला, कोणी मला फुलं दिली, कोणी माझ्या तब्येतीची काळजी करत खाण्याच्या वस्तू दिल्या, कधी उन्हात उभा राहिलो, तर माझ्या डोक्यावर छत्री धरली, कोणी खिशाला पेन लावला. आज NDTV पेक्षा मी तुमच्या आठवणीत जास्त रमतो आहे.
मला तुम्हा सर्व प्रेक्षकांचा अभिमान वाटतो. अनेक वेळेला मला वाटत, मी संस्थेचा कमी आणि तुमचाच जास्त प्रतिनिधी आहे. मला माझ्या संस्थेत काम करण्याचं स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणात मिळालं, मात्र मी त्या स्वातंत्र्याला फार सांभाळलं. कारण तुमची नजर सतत माझ्यावर होती. माझ्याकडून चूक होणार नाही, माझ्यात अहंकार घुसणार नाही याची काळजी घेतली. माझ्यासमोर जग बदलत राहिलं, मी मात्र टेस्ट क्रिकेटमधल्या खेळाडूसारखा पिचवर टिकून राहिलो; परंतु आता कोणी तरी तो सामना संपवला आणि त्याला T -20 मध्ये रुपांतरीत केले.
लोकांना चार आणे समजणारे जगतसेठ प्रत्येक देशात आहेत, आपल्याकडेही आहेत आणि जर ते सांगत असतील, की तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याची आमची इच्छा आहे, तर याचा अर्थ आपल्या खिशात रुपया टाकून तुमच्या खिशात चार आणे टाकण्याचा त्यांचा विचार आहे. हे समजून घ्या. एखाद्या पत्रकाराने त्यांच्याविषयी लिहिले, बोलले तर त्याविरुद्ध खटला भरतात आणि दुसर्‍या बाजूला पत्रकारितेची चिंता करतात. मात्र तुम्ही प्रेक्षक हे सर्व समजता. म्हणूनच आज मी माझ्या संस्थेपेक्षा तुम्हा प्रेक्षकांची आठवण काढतो आहे. मी NDTV मधून राजीनामा दिला आहे. नमस्कार.
(लेखक राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.